खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मिलिटेड खारेपाटण या शेतकरी संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा कांतिलाल जठार यांना वैयक्तिक व्यवसायासाठी कर्जाद्वारे ‘भारत बेंज’ कंपनीचा सुमारे ५२ लाख ४६ रुपये किमतीचा अवजड डंपर वाहन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक विजय देसाई यांच्या शुभ हस्ते वाहनाच्या चाव्या सुपूर्द करून वितरीत करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा खारेपाटणचे सब अकाऊंट राजन रावराणे, लिपिक भावेश कर्ले, खारेपाटण गट विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन एकनाथ कोकाटे, संचालक सुरेंद्र कोरगावकर, इस्माईल मुकादम, अशोक पाटील, श्रीधर गुरव, मंगेश गुरव, मोहन पगारे, संचालिका तृप्ती माळवदे, उज्वला चिके तसेच संस्थेचे सचिव अतुल कर्ले, संस्थेचे सभासद व वारगाव सरपंच नाना शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण सोसायटीचे चेअरमन रवींद्र जठार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा खारेपाटण व खारेपाटण गट विकास सोसायटीचे मनपूर्वक आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक व कर्मचारी वर्ग यांनी रवींद्र जठार यांचे अभिनंदन करून त्यांना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.











