कै. संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबीर ६ डिसेंबर रोजी

चिंदर सेवा संघाचे सलग सातव्या वर्षी आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : “समाज सेवेचे भान-रक्तदान हेच श्रेष्ठदान” या उक्तीला अनुसरून चिंदर सेवा संघ, चिंदर, गेली सात वर्षे सलग चिंदर यात्रोत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. यंदा चिंदर सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष कै. संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिर शनिवार दि. ०६/१२/२०२५ सकाळी ९:३० ते दुपारी १ पर्यंत “भगवती मंगल कार्यालय चिंदर, भटवाडी” येथे आयोजित केले आहे.

प्रकाश मेस्त्री- ८५५४०५८२२७, गणेश गोगटे- ७५०७०००५९९, सिद्धेश गोलतकर- ७७९८७४८८९७, प्रसाद टोपले- ९४२१०८७४०६, भाई तावडे – ९४२०७९२९९०, संतोष अपराज ९४२३३०४०१७, निशांत पारकर ९०४९०५२५३२, आशिष कोरगांवकर ९४२०३०८२१३, यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिवर्षी जमा होणारी सर्व ब्लड कार्ड्स गावातील, दशक्रोशीतील गरजू, दुर्घटनाग्रस्त किंवा आकस्मित शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांना मोफत रक्त पिशवी मिळवून देण्यासाठी वापरली जातात. कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे रुग्णाला रक्त मिळण्यास अडथळा होऊ नये, हा चिंदर सेवा संघाचा संकल्प असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्ताचे पुण्यवान करावे असे आवाहन चिंदर सेवा संघ चिंदर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!