शिकार करताना एकजण बंदुकीच्या गोळीने ठार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन मर्गज नावाचा ३५ वर्षिय युवक कोलगावातील दोन व्यक्तींसोबत शिकारीसाठी जंगल भागात गेला असता, गोळी चुकून लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोलगाव येथील श्रीपियन आणि त्याचा एक सहकारी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून घटनेबाबत चौकशी सुरू असून, गोळी कोणत्या परिस्थितीत सुटली याचा तपास पोलीस करीत आहेत.

घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, गावात या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

error: Content is protected !!