मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ वॉर्डच्या वतीने महापरिनिर्वाणदिनी अल्पोपहार वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ई’ विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून बाबासाहेबांना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आलेल्या सुमारे ४० हजार अनुयायांना दि. ५ व ६ डिसेंबर २०२५ रोजी मोफत अल्पोपहार देण्यात आले.

दरवर्षी चैत्यभूमीवर मुंबई महानगर पालिकेच्या वतीने अल्पोहरचा उपक्रम राबविला जातो. यावर्षी उपायुक्त (परि-१) चंदा जाधव आणि सायन रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. मोरे आणि त्यांचे सहकारी तसेच कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ. सरवदे यांनीही या उपक्रमास सदिच्छा भेट दिली. तर झोन-१ चे तत्कालीन उप आयुक्त एस. एस. शिंदे यांच्या सहकार्य आणि प्रेरणेतून सुरु झालेला हा स्तुत्य उपक्रम ‘ई’ विभागातील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी गेली २३ वर्षे राबवित आहेत.

५ डिसेंबर २०१७ रोजी ओखी वादळामुळे आलेल्या आकस्मिक पावसामुळे महापालिकांच्या शाळांमध्ये आश्रय घेतलेल्या अनुयायांसाठी देखील त्यावेळी दोन दिवस भोजनाची व्यवस्था या विभागाच्या वतीने करुन देण्यात आली होती. तसेच महाप्रलयकाळी पावसाने हाहाकार माजवल्यांने कोकणातील महाड, चिपळूण, खेड भागात पुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. अशा ओढवलेल्या अस्मानी संकटातही त्यांनी मदतीचा हात पुढे करुन, २०० पुरग्रस्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास बॉक्स, वह्या, पेन, पेन्सिल बॉक्स, कापडी मास्क इत्यादी शालोपयोगी साहित्याचे त्या ठिकाणी जाऊन वाटत केले होते.

हा स्तुत्य उपक्रम मुंबई महानगरपालिका ‘ई’ विभाग कार्यालय, अधिकारी व कर्मचारी वर्ग गेली २३ वर्षे अविरत पणे राबवित आहेत. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!