कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील गोवेरी भगतवाडी येथील साकव बांधकामासाठी जिल्हा परिषद वार्षिक विकास योजनेतून ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत मंजुरी मिळवून देणारे कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांचे स्थानिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
साकवाच्या मंजुरीमुळे गोवेरी आणि भगतवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येथील वाहतूक, शेती, शिक्षण आणि दैनंदिन हालचाल अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून हा निर्णय स्थानिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.












