वैभववाडी (प्रतिनिधी) : कोरोना काळापासून बंद असलेली खारेपाटण – नृसिंहवाडी एस टी बस पुन्हा पुर्ववत सुरू झाली आहे. खारेपाटण येथुन सकाळी ७ वाजता व नृसिंहवाडी येथून दुपारी २ वाजता ही बस सुटणार आहे. यामुळे खारेपाटण, तिथवली, कोळपे, उंबर्डे, कुसुर, मांगवली, भुईबावडा, ऐनारी, रिंगेवाडी, नानिवडे येथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
खारेपाटण – नृसिंहवाडी बससेवा आजपासून पूर्ववत












