तळेरे प्रभाग स्तरीय बाल,कला क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

“या स्पर्धांमधून उद्याचे राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील – दिलीप तळेकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा भरविण्यात येतात.मात्र या स्पर्धांमधून उद्याचे राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील.असे भावपूर्ण उदगार कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांनी तळेरे प्रभाग स्तरीय बाल,कला,क्रीडा,सज्ञानी मी होणार समूह गान,समूह नृत्य महोत्सव उद्घघाटन कार्यक्रमात बोलताना काढले.

खारेपाटण ,शेर्पे,साळीस्ते व कासार्डे या चार केंद्रातील शाळांचा सहभाग असलेला प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा महोत्सव आज गुरुवार दि.११ डिसेंबर २०२५ रोजी तळेरे हायस्कूलच्या भव्य प्रांगणावर कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.तर या क्रीडा महोत्सवाचे उद्घघाटन जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य प्रकाश पारकर,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी,कुरंगवणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे,तळेरे हायस्कूल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद महाडिक,तळेरे जि.प.प्रा.शाळा नं.१ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव,खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,तळेरे प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर,तळेरे हायस्कूल मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर बीट मुख्याध्यापक महेंद्र पावसकर,साळीस्ते व खारेपाटण केंद्रप्रमुख गोपाल जाधव,कासार्डे व शेर्पे केद्रप्रमुख संजय पवार, जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, पपी वरूणकर, पोलिस पाटील चंद्रकांत कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी क्रीडा महोस्ताची क्रीडा ज्योत दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते प्रज्वलित करून विद्यार्थिकरवी ती संपूर्ण मैदानावर फिरविण्यात आली.तर सर्व विद्यार्थी व शिक्षकांना सामूहिक क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली. तर क्रीडांगनाचे उद्घघाटन प्रकाश पारकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.या महोत्सवाला उपस्थित सर्वं मान्यवरांचे तळेरे प्रभागाच्या वतीने करण्यात आले.या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला क्रीडा प्रमुख म्हणून.श्रीराम विभुते तर उपक्रिडा प्रमुख म्हणून संतोष कुडाळकर यांनी काम पहिले.

या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो – खो,उंच उडी,लांब उडी,गोळा फेक,१००/२०० मीटर धावणे ४/१ रिले आदी खेळांचा समावेश असून दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात न्यांनी मी होणार,समूह गान,समूह नृत्य स्पर्धेत विद्यार्थी आपल्या कला गुण येथे सादर करणार आहेत.या सपूर्ण कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर यांनी केले.तर सूत्रसंचलन व आभार आनंद तांबे यांनी केले.या क्रीडा महोत्सवात तळेरे प्रभागातील जि.प.प्राथमिक शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,ग्रा.पं.सदस्य शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!