आरोंदा हायस्कूलमध्ये २४ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, आरोंदा संचलित आरोंदा हायस्कूल, आरोंदा (ता. सावंतवाडी) येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रम सायंकाळी ४.०० ते ६.३० या वेळेत उद्घाटन व पारितोषिक वितरणाने सुरू होणार असून, शैक्षणिक, क्रीडा व विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री ११.०० या वेळेत विद्यार्थ्यांचे गुणदर्शनपर व रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. संदेश रघुनाथ परब (अध्यक्ष, आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, आरोंदा) भूषवणार असून, मा. श्रीधर बाजीराव पाटील, तहसीलदार, सावंतवाडी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आपले नम्र म्हणून रघुनाथ गणेश नाईक (उपाध्यक्ष), वासुदेव महादेव देसाई (सचिव), रूपेश प्रभाकर धर्णे (खजिनदार व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष) तसेच सिद्धार्थ गोपाळ तांबे, मुख्याध्यापक, आरोंदा हायस्कूल, आरोंदा हे विशेष परिश्रम घेत आहेत.

तसेच शालेय सांस्कृतिक समितीमध्ये भावना भा. माजगावकर, सुप्रिया दि. कोरगांवकर, चंदन सु. गोसावी, निवेदिता सं. नाईक, गोपीनाथ दे. देवजी, आनंदा म. कुद्रेमणी व मिलिंद नि. कांबळी यांचा सक्रिय सहभाग लाभत आहे.

स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा शाळेचा प्रयत्न असून, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!