अखेर विकेट पडलीच | मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत राजीनामा स्वीकारण्याची केली मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची शेवटी विकेट पडली असून त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान राखत तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे. संबंधित पत्रात मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वेच्छेने आपला राजीनामा सादर केल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!