कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या खांद्यावर प्रदेश भाजपाकडून कल्याण महानगरपालिका निवडणूकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रमोद जठार यांची कल्याण महानगरपालिका निवडणूकसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. जठार हे संघटनकौशल्य असणारा नेता म्हणून भाजपात ओळ्खले जातात. आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी निवडणूक प्रभारी या नात्याने जठार यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
प्रमोद जठार यांची महानगरपालिका निवडणूकीसाठी निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती










