विद्यार्थ्यांनी शोधक वृत्ती जोपासून स्वतःला ज्ञानाच्या बाबतीत अद्यावत ठेवावे!!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे, मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अवांतर वाचनावर भर द्या. मोबाइल हे दुधारी शस्त्र आहे त्याचा अतिवापर टाळून आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठीच त्याचा वापर करा. असा सल्ला कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी दिला.शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्या याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष मुकुंद धुरी,सचिव प्रदीप प्रभूतेंडोलकर, झारपचे प्रथितयश यश उद्योजक दिलीप प्रभूतेंडोलकर देवेंद्र प्रभूतेंडोलकर,दीपेश प्रभूतेंडोलकर संचालक सतीश साळगावकर,एड.विवेक मांडकुलकर मोहन सावंत, शांताराम धुरी, तुकाराम गोडे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष उमेश प्रभूतेंडोलकर, संजय सामंत लक्ष्मण पालव,वासुदेव मेस्त्री, एकनाथ गवस ,श्रीमती वैशाली खानोलकर, प्रभाकर मेस्त्री,मुख्याध्यापक सलीम तकीलदार, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन पाटकर नितीन कुडाळकर,अनिता हळदणकर, विभा सावंत, वैभव हरमलकर आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

तहसीलदार सचिन पाटील म्हणाले,आपण सजग विद्यार्थी बनलं पाहिजे आज तुम्हाला अनेक प्रलोभने विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात, तुम्ही स्वतःला स्वयंम शिस्त लावून घ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कठीण काळ येतो अशावेळी तो काळ म्हणजे आपल्या संयमाच्या परीक्षेचा काळ आहे असे समजून काम करा शासनाने आज स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारे शासन स्तरावर मार्गदर्शनाची दालने खुली केली आहेत त्याचा फायदा घ्या व स्वतःला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करा आपल्या भागात गुणवत्तेची कमतरता नाही त्यासाठी प्रयत्नात सातत्य व अचूक नियोजनाची गरज आहे व तसे झाले तर आपण यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो असे सांगितले. तसेच संस्था सचिव प्रदीप प्रभूतेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संबोधन करताना जीवनात कितीही संकटे आली तरी ध्येयापासून विचलित होऊ नका असे सांगून बक्षीस धारक विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याबद्दल विशेष कौतुक केले.यावेळी संस्था अध्यक्ष मुकुंद धुरी यांनी विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीमध्ये प्रयत्न करून आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा असे सांगत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक हस्तलिखित’ मृदगंध’ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात धवल यश संपादित केलेल्या प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

चालू वर्षीचा क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून कुमार राज जाधव व कुमारी समीक्षा बावदाणे यांची तर आदर्श विद्यार्थी-विद्यार्थीनी म्हणून अनुक्रमे इयत्ता दहावी बारावीसाठी कुमार तुकाराम हळदणकर, कुमारी निधी सावंत कुमार नीरज टिळवे, कुमारी निकिता देवळी यांची निवड करण्यात आली. तसेच विद्यालयामध्ये पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देणाऱ्या ‘शिवराज टॅलेंट सर्च’ या स्पर्धा परीक्षेच्या बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संचालक व झाराप येथील उद्योजक देवेंद्र प्रभूतेंडोलकर यांनी विद्यालयाला वॉटर प्युरिफाय भेट स्वरूपात देण्याचे जाहीर केले. संध्याकाळच्या सत्रात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमांचे उद्घाटन कुडाळ स्थित उद्योजक कृष्णा धुरी यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी तर सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षक एकनाथ कांबळे व सहाय्यक शिक्षिका सुप्रिया पेडणेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक परशुराम नार्वेकर यांनी केलं.

error: Content is protected !!