कणकवली (प्रतिनिधी) : साईबाबा सोशल क्लबचे सर्वेसर्वा मिंगेल मंतेरो यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस गौरव गवाणकर मित्रमंडळाच्या वतीने कणकवली येथे केक कापून साजरा करण्यात आला. गौरव गवाणकर मित्रमंडळाच्या वतीने केक कापून मिंगेलशेठ यांना सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच साईबाबा सोशल क्लब कार्यालयातही मंतेरो यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. चिपळूण येथील मिंगेल यांचे सन्मित्र कोकाटे यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देत मिंगेल यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गौरव गवाणकर, शिशिर परुळेकर, चंदन पाटील, रवींद्र बाणे, सचिन कुवळेकर, नाना सापळे, संजय पारकर, संतोष राणे, सुधीर साटम आदी उपस्थित होते.
मिंगेल मंतेरो यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा










