शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे शिवराज टॅलेंट सर्च शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव संचलित शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेला साळगाव झाराप, तेर्सेबांबर्डे, आकेरी, हुमरस, कामळेवीर आदी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षा संपन्न झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र संस्था अध्यक्ष मुकुंद धुरी, संचालक शांताराम धुरी प्रशालेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आली.

आयोजकांनी या परीक्षेचा निकाल त्याच दिवशी संध्याकाळ पर्यंत जाहीर केल्यामुळे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यां साठी विनामूल्य सहभाग, परीक्षा झाल्यावर लगेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण आणि परीक्षेच्या दिवशीच सर्व उत्तरपत्रिका तपासून लगेच निकाल जाहीर केल्यामुळे हे नियोजन कौतुकास्पद झाल्याचे बोलले जात आहे. या परीक्षेत ई. चौथी मधून प्रथम क्रमांक कु. मृणाल किरण सावंत (कांदुळी), द्वितीय क्रमांक कु. अर्णव अमोल खरात (कांदुळी) तृतिय क्रमांक कु. निमिष निलेश सावंत (साळगाव जांभरमळा) तसेच ई सातवी मधून प्रथम क्रमांक कु. अथर्व शिरीष वेंगुर्लेकर (झाराप कामळेवीर), द्वितीय क्रमांक कु. दक्षता नंदकिशोर जाधव, (साळगाव क्र. ३) तृतिय (विभागून) क्रमांक कु. दुर्वांक संतोष कुंभार (आकेरी हुमरस) कु. आत्माराम आनंद परब (आकेरी हुमरस) यांनी यश संपादन केले.

शिवराज मराठा विद्यालय या प्रशालेचे मुख्याध्यापक सलीम म. तकीलदार, शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशीचे अध्यक्ष मुकुंद रा. धुरी आणि सर्व शालेय शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षासाठी शुभेच्छा दिल्या. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

मृणाल किरण सावंत, प्रथम क्रमांक, ई चौथी, शाळा कांदुळी

अर्णव अमोल खरात, द्वितीय क्रमांक, ई चौथी, शाळा कांदुळी

निमिष निलेश सावंत, तृतिय क्रमांक, ई चौथी, शाळा साळगाव जांभरमळा

अथर्व शिरीष वेंगुर्लेकर, प्रथम क्रमांक, ई सातवी, शाळा झाराप कामळेवीर,

दक्षता नंदकिशोर जाधव, द्वितीय क्रमांक, ई सातवी, शाळा साळगाव क्र. ३

आत्माराम आनंद परब, तृतीय क्रमांक, ई सातवी, शाळा आकेरी हुमरस

दुर्वांक संतोष कुंभार, तृतीय क्रमांक, ई सातवी, शाळा आकेरी हुमरस

error: Content is protected !!