अल्पवयीन मुलीची छेडछाड सुनील पाटील ला भोवली…. पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी सावंतवाडी येथील ३८ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सुनील उर्फ सनी बाळू पाटील (रा. सावंतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिची छेडछाड केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी तत्काळ सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी पाटील फरार झाला होता. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत शहरात विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. अखेर रात्री उशिरा आरोपीला शोधून काढत त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!