खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नडगिवे या गावाचे सुपुत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई सचिव पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व मुंबई विभागाचे अध्यक्ष मिलिंद अण्णा कांबळे यांनी नुकतेच लेखी पत्राद्वारे सुभाष पाटील यांची मुंबई सचिव पदी निवड जाहीर केली आहे.गेली ४० वर्षे सुभाष पाटील हे राजकीय क्षेत्रात सक्रिय असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेवून ते पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहेत.
याबरोबरच सुभाष पाटील हे खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती चे विद्यमान सदस्य असून बांबरवाडी प्रगती मंडळाचे ते जनरल सेक्रेटरी आहेत तसेच गंगेश्वर ग्रामस्थ मंडळ नडगिवेचे ते सक्रिय सदस्य आहेत.तसेच ते राहत असलेल्या हाऊसिंग सोसायटीचे देखील चिटणीस म्हणून काम करत आहेत.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तसेच समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी काम करणार असून पक्ष संघटना वाढीसाठि धार निरपेक्ष पाने काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.”












