सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श उपक्रम; श्री गांगेश्वर मंदिर परिसरात २५ विविध वृक्षांची लागवड

वृक्षारोपण करून निसर्गाच्या सान्निध्यात साजरा केला राजू जठार यांनी ५५ वा वाढदिवस

तळेरे (प्रतिनिधी) : जन्मदिन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि नव्या संकल्पांचा दिवस असतो. अनेकजण हा दिवस कुटुंबीय, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांसोबत साजरा करतात. मात्र, अलीकडच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि निसर्गप्रेमाचे संदेश देत वाढदिवस साजरा करण्याची सकारात्मक परंपरा रुजू लागली आहे. हीच संकल्पना राजू जठार यांनी रुजवून प्रत्यक्षात अमलात आणली. सामाजिक बांधिलकी जपत निसर्गाच्या सान्निध्यात वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा पायंडा पाडला.

याच संकल्पनेला अनुसरून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे कार्यवाह तथा तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत (राजू) जठार यांनी आपला ५५ वा वाढदिवस तळेरे येथील श्री गांगेश्वर मंदिर परिसरातील देवराईमध्ये २५ विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करून साजरा केला.

निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी आणि आध्यात्मिक विचारांचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या राजू जठार यांनी पर्यावरणातील वाढते असंतुलन आणि त्याचे भविष्यातील परिणाम लक्षात घेऊन वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात उतरविला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करून हा आदर्श इतरांनीही घ्यावा, अशी भावना व्यक्त केली.

या उपक्रमाला माजी सभापती तथा कणकवली तालुका ग्रामीण मंडळाचे भाजपा अध्यक्ष दिलीप तळेकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर, ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत तळेकर, अशोक तळेकर, उमेश कदम, नामदेव वाडेकर, नरेश वरुणकर, सुरेंद्र वरुणकर, प्रवीण वरुणकर तसेच व्यापारी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजू जठार यांना उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्यासाठी श्री गांगेश्वर चरणी प्रार्थना केली. तसेच त्यांच्या हातून भविष्यातही असेच समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने घडत राहावेत, अशा सदिच्छाही व्यक्त केल्या.

सायंकाळी तळेरे येथील निवासस्थानी घरगुती स्वरूपाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर त्यांनी शुभेच्छा स्वीकारून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक झाड भेट स्वरूपात दिले. जेणेकरून प्रत्येकाकडून दिलेले झाडं लावले जाईल आणि त्याचे चांगल्या प्रकारे संगोपन केले जाईल. प्रत्येकाने एक तरी झाड लाऊन त्याचे संवर्धन आणि संरक्षण करुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हातभार लागावा हीच या मागील संकल्पना होती. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याची योग्यप्रकारे जोपासना करुयात हाच संदेश राजू जठार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने यातून द्यायचा होता. निसर्ग संवर्धन आणि संरक्षण करणारी अतिशय चांगली संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणल्या बद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याप्रसंगी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, पोकळे पेट्रोल पंपाचे संचालक प्रवीण पोकळे, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सचिन पावसकर, राजेंद्र पिसे, मनोज महाडिक, नामदेव वाडेकर, दारुम गावचे माजी सरपंच राजेंद्र तळेकर, उपसरपंच भरत चव्हाण, दिनेश मुद्रस, प्रविण शशिकांत वरुणकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, श्रावणी कम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे, सौ.श्रावणी मदभावे, महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा सौ.संपदा महाडिक, सुयोग महाडिक यांच्या सह ग्रामस्थ, व्यापारी, नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!