महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र; मनसे–शिवसेना (ठाकरे गट) युतीची घोषणा

राज–उद्धव ठाकरे यांची ऐतिहासिक युती; मुंबई महापालिकेसाठी एकत्र रणांगणात

मुंबई (प्रतिनिधी) : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी महापालिका निवडणुकांसाठी युती करण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तर उद्धव ठाकरेंचा शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकत्रितरितरित्या महापालिका निवडणुकांना सामोरं जाणार आहेत. वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली घेत मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा करण्यात आली. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा खात्मा केल्याशिवाय आम्ही ठाकरे बंधू राहणार नाही. आता चुकाल तर संपाल आता फुटाल तर तुटून जाल तुटू नका, फुटू नका, महाराष्ट्राचा वसा टाकू नका, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं. गेल्या वेळी, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मला वाटत जिथून एकत्र येण्याची सुरूवात झाली. कोण किती जागा लढवणार आकडा काय हे तुम्हाला नाही सांगणार. महाराष्ट्रात लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहे, त्यातदोन राजकीय टोळ्यां अड झाल्या आहेत. शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी आज जाहीर करतो, असं म्हणत राज ठाकरे यावेळी म्हणाले. पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.

error: Content is protected !!