कलाशिक्षक मंदार चोरगे ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित

श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पुरस्कार सोहळा संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : शैक्षणिक व सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात गेली १० वर्षे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षी ‘ज्ञानदीप पुरस्कार’ देवून गौरविण्यात येते. शैक्षणिक क्षेत्रात गेली १२ वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. आज गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न संपन्न झाला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कलाशिक्षक मंदार चोरगे यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. यावेळी ज्ञानदीपचे संस्थापक वाय. पी. नाईक व सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!