कणकवली तालुक्यात आई भवानी देवींच्या त्रिवार्षिक गोंधळ-जगरणाची जय्यत तयारी; भाविकांसाठी दोन दिवसांचा भक्तिमय कार्यक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी श्री आई भवानी देवींचा त्रिवार्षिक गोंधळ-जगरण कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. हा पवित्र धार्मिक सोहळा भवानी प्रसाद, मु. पो. हुंबरट, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे पार पडणार असून या निमित्ताने भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून आई भवानीचे दर्शन, आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता संबळ वादन, देवीची ललकारी व चंडेश्वरी पूजेनं होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.४५ वाजता गावरहाटीचे गाराने व देवकार्य पार पडेल. सायंकाळी ४ वाजता जोगवा फेरी काढण्यात येणार असून, सायंकाळी ७ वाजता मांड व दिवटी पेटवून देवीचा गजर केला जाणार आहे.
रात्री ८ वाजता ओटी भरणे, नवस फेडणे, नवस बोलणे व गरबा कार्यक्रम होईल. यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजल्यापासून गोंधळ्याचा गोंधळ व देवीची कथावाचन सेवा सुरू राहील. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता देवीची आरती, ओटी भरणे व नवस फेडणे आदी धार्मिक विधी होऊन सकाळी ६ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता मुलांसाठी सांस्कृतिक मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता श्री गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळ, हुंबरट (मालक : आप्पा दळवी) यांचे दशावतार नाटक सादर होणार आहे.
हा संपूर्ण धार्मिक व सांस्कृतिक सोहळा समस्त दळवी बंधू यांच्या आयोजनाखाली पार पडत असून, कार्यक्रमासाठी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा हि विनंती देणगीसाठी गुगल पे क्रमांक ९८६९२३३८०९ उपलब्ध करून देण्यात आला आहे.











