कलमठ बाजारपेठ शाळेतील दुसरीचा विद्यार्थी शोभीतचा विक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणुन ओळखले जाणारे कळसुबाई शिखर समुद्रसपाटी पासुन सुमारे उंची 1646 मीटर आहे.हे शिखर अहमदनगर व नाशिक जिल्हाच्या सीमेवर वसलेले असुन या ट्रेक मध्ये कलमठ बाजारपेठ शाळेतील ई.2 री तील विद्यार्थी शोभित कासले दि. 24 व 25 डिसें.ला सहभागी झाला होता. यापूर्वी ही पावनखिंड ते विशालगड अशी पदभ्रमंती पूर्ण केली होती. अश्या ट्रेक च्या आवडीमुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. या मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच जण सहभागी होते.










