कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे-दत्तनगर येथील दुर्गा देवेंद्र खटावकर या विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, अशी तक्रार मृत दुर्गा हिचा भाऊ अजय मुळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार दुर्गा हिचे पती देवेंद्र रंजन खटावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गा खटावकर या तळेरे दत्त मंदिर कॉलनी येथे राहत होत्या. त्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या गॅलरीत गळमास घेत आत्महत्या केली. त्यांची मुलगी सान्वी हिच्या हा प्रकार लक्षात आला. सान्वी हिने तात्कळ आपले आजोबा रंजन खटावकर यांनी घटनेची माहिती दिली. याप्रकरणी दुर्गा हिचे भाऊ अजय संतोष मुळे (३२ , रा. बेळगाव यांनी पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून माझ्या बहीणीने आत्महत्या केली, अशी तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार देवेंद्र खटावकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शेगडे करीत आहेत.










