अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही
नांदगाव सरपंच यांच्या हस्ते फित कापून आणि शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या हस्ते नारळ फोडून झाले उद्घघाटन
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या हायवे ब्रिज लगत असलेल्या तलाठी कार्यालय बाजूच्या गाळा येथे आज नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते फित कापून आणि शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या शुभहस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.


या कार्यक्रमाला कैलास राणे, मंगेश गुरव, सरिता राऊत ,निरज मोरये, राजू तांबे, नांदगाव ग्राम महसूल अधिकारी चौगुले, प्राची मोरये तसेच स्वाभिमान चे संघटनेचे सदस्य उपस्थित होते. या वस्तू प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात नागरिकांना आटा चक्की, शिलाई मशीन, एलईडी टीव्ही आणि सायकल या वस्तू भरघोस सवलतीच्या दरात आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज काही महिलांनी अल्प दरातील शिलाई मशीन खरेदी करुन या व्यावसायिक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तरी जास्तीत जास्त जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे शिवसेना पक्षाचे कणकवली तालुका मंगेश गुरव यांनी केले. तर नीरज मोरया व सरिता राऊत यांनी राबविलेला स्तुत्य उपक्रम आहे याचा लाभ ग्रामीण भागातील महिला व तरुण यांनी 7 वघ्यावा असे आवाहन मोरजकर यांनी केले. कैलास राणे यांनी उपक्रमाची माहिती उपस्थितीताना दिली व नीरज मोरये यांनी सर्वांच आभार मानले.











