वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री लक्ष्मीदेवी जागर उत्सवानिमित्त सोमवार दिनांक २९ डिसेंबर ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री लक्ष्मी देवी मंदिर जांभवडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी आठ वाजता घटस्थापना, तर दर दररोज सकाळी १० ते १२ वाजता कीर्तन, सायंकाळी ५ ते ७ वाजता हरिपाठ, तसेच रात्री ९ ते ११ दरम्यान कीर्तन, तर रात्री ११ ते १२ जागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन व प्रवचन होणार आहेत. यामध्ये ह भ प दौलत महाराज पाटेकर, गणपत महाराज पांचाळ, राजेश महाराज सुतार, नानासाहेब जेधे, पंढरीनाथ म्हासुर्णेकर सातारा, रमेश शिवापुरकर सोलापूर, आदी मान्यवर कीर्तनाकारांचे कीर्तन होणार आहेत. तर ह भ प रामचंद्र महाराज घोणेकर कोल्हापूर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह ला पालकमंत्री नितेश राणे, आमदार किरण सामंत, समाजसेवक सुनील नारकर, माजी उपसभापती भालचंद्र साठे, माजी सभापती नाशिर काझी, वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, स्वप्नील खानविलकर, देवानंद पालांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आव्हान अखंड हरिनाम सप्ताह समिती जांभवडे ग्रामीण व मुंबई यांच्या वतीने आकाराम गुरव, राजेंद्र गुरव यांनी केले आहे.
जांभवडे येथे २९ डिसेंबर पासून अखंड हरीनाम सप्ताह










