पणदूरच्या संविता आश्रमात उपचाराने बरे झालेल्या तरूण तरूणीच्या विवाहाचा सामाजिक उपक्रम
खारेपाटण (प्रतिनिधी): मानवी जीवनात विवाहाच्या पवित्र संस्कारानंतर दोन वेगळ्या जीवांचे मिलन होते. विवाहप्रसंगी अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांच्या साथीसोबतीने आयुष्य व्यतीत करण्याचा संकल्प या दोन व्यक्ती यावेळी समाजासमोर एकप्रकारे जाहिर करीत असतात. विविध कारणांनी आश्रमात राहून जीवन व्यतीत करणारे बांधव आणि आणि भगिनी हे माणसांसारखी माणसं आहेत. त्यांनाही माणसांच्या जीवनातील भावभावना आहेत, हे लक्षात घेवून …जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांच्या पुढाकारातून पणदूरच्या संविता आश्रमातील युवा भगीणी चि.सौ.का. द्वादशी व संस्थेच्या अणाव येथील कै.सुप्रियाताई वेंगुर्लेकर पुनर्वसन केंद्रातील संजय या परस्पर अनुरूप जोडीचा शुभविवाह सोहळा त्यांच्या सहमतीने साधेपणाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पणदूर येथे महाबळेश्वर गुरूनाथ कामत यांच्या निवासस्थानी विवाहसोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबई, गोवा, देवगड, सावंतवाडी,ओरस,कुडाळ, मालवण,बांदा इ.ठिकाणांहून पाहुणे मंडळी उपस्थीत होती. कार्यक्रमाच्या संयोजनात जेष्ठ नागरिक संघ सावंतवाडी, गीता पेडणेकर, कृतुजा परब, दिपा चाटे, कासकर मॅडम, डाँ.मालपेकर ,प्रसाद कामत,आळवणी मँडम यांचे मोलाचे सहाय्य झाले. कार्यक्रम प्रसंगी गोवा म्हापसे येथील सारस्वत काँलेजचे प्रिंसिपल डाँ.संतोष पाटकर, जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष नरेश चव्हाण, विश्वस्त पुनम बुर्ये, किसन चौरे यांचेसह माजी सरपंच दादा साईल, चंद्रकांत साईल, संध्याताई, खानोलकर , संदेश बुर्ये, SCI चे नितीन वेंगुर्लेकर, गोव्यातील सुप्रसिध्द धावपटू सुनिता यांची यावेळी प्रमुख उपस्थीती होती. संविता आश्रमचे महाबळेश्वर कामत, देवु सावंत, भक्ती परब, आशिष कांबळी, प्रसाद आंगणे, निता गावडे-सावंत, आरती वायंगणकर, विजया कांबळी,सचिन पडते, ज्योती आंगणे, नरेश आंगणे, मुसळे,विजय नाईक, पालव काका, राज परब इ.कार्यकर्ते व आश्रमातील टायगर वाँर्डमधील बालकांनी महत्वाची भूमिका पार पाडली. यावेळी संस्थेच्या आश्रमातील सेवक कार्यकर्ते व बांधवांनी विवाह सोहळ्यात बेन्जोच्या तालावर नृत्य करून मनसोक्त धमाल केली.