महोत्सवातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

वैभववाडी (प्रतिनिधी) : देशाचे भावी नागरिक घडविण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील या क्रीडा महोत्सवाला एक वेगळे महत्त्व आहे. या महोत्सवात आपण काळानुसार बदल केले पाहिजेत. क्रीडा महोत्सवाला तालुक्यातील लोकसहभाग देखील मोठा असला पाहिजे. तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी मी तुमच्यासोबत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

वैभववाडी तालुकास्तरीय बाल, कला, क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन नाधवडे येथे पार पडले. यावेळी नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, गटशिक्षण अधिकारी अशोक वडर, भालचंद्र साठे, बाप्पी मांजरेकर, तुळशीदास रावराणे, बंड्या मांजरेकर, दिगंबर पाटील, बाळा जठार, प्राची तावडे, लीना पांचाळ, श्रद्धा रावराणे, संजय पाताडे, रामचंद्र जंगले व पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नितेश राणे म्हणाले, या तालुक्याची लोकसंख्या 38 हजार इतकी आहे. त्यामुळे या महोत्सवाला त्या तुलनेत लोकसहभाग अपेक्षित आहे. या महोत्सवाला एक वेगळी परंपरा आहे. नवीन बदल होणे अपेक्षित आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी तुमच्या सोबत आहोत. या पंचायत समितीच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले पाहिजे अशा सूचना त्यांनी गटविकास अधिकारी श्री. वाघ यांना दिल्या. इतर जिल्ह्यात राबविण्यात येणारे उपक्रम या ठिकाणी राबविले गेले पाहिजे. शाळा दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी लोकसहभाग, शैक्षणिक उठाव होत आहे. याचं निश्चितच कौतुक आहे. आता तुमचा पालकमंत्री कुटुंबातील आहे. त्यामुळे ही कामे सुद्धा मी मार्गी लावणार असे सांगितले.

प्रिमेश वाघ म्हणाले, या महोत्सवाचा निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. मोठा कार्यक्रम भविष्यात घेऊ, जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. या महोत्सवातून संस्कृतीचे जतन आपण सर्वांनी करूया. या ठिकाणी चांगले अधिकारी घडवण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील असे सांगितले. सुधीर नकाशे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाताडे पाताडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच तालुक्यातील विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!