जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापनेची नोंदणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतमधील सत्ताधारी शहर विकास आघाडी च्या गटनेतेपदी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्याकडे शहर विकास आघाडी गट स्थापनेचे लेखी पत्र नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सुपूर्त केले.यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह गटनेता रुपेश नार्वेकर, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, सुशांत नाईक, जाई मुरकर, दिपीका जाधव, सुमेधा अंधारी , बाळू पारकर, आदी उपस्थित होते.










