सुप्रिया नलावडे यांची भाजपा कणकवली नगरपंचायत गटनेतेपदी निवड

भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत मधील भाजपाच्या गटाची स्थापना करण्यात आली असून गटनेतेपदी नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांची एकमुखी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे कणकवली नगरपंचायत मधील भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. यावेळी गटनेत्या सुप्रिया नलावडे, भाजपाचे नूतन नगरसेवक राकेश राणे, स्वप्नील राणे, संजय कामतेकर, प्रतीक्षा सावंत,मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, तसेच ऍड.परिमल नाईक उपस्थित होते. कणकवली नगरपंचायत भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया नलावडे यांची निवड झाल्यानंतर कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ देत नलावडे यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रज्वल वर्दम, बाळा सावंत, मिथुन ठाणेकर, सर्वेश दळवी, औदुंबर राणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!