आमदार नितेश राणे स्वखर्चाने करणार सायकल वाटप
कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील 100 शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करणार आहेत. 1 मे रोजी सकाळी 11 वाजता ओम गणेश बंगल्यावर सायकल वाटप करण्यात येणार आहे.10 एप्रिल रोजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवशी पहिल्या टप्प्यात शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आता 1 मे रोजी दुसऱ्या टप्प्यात 100 शाळकरी मुलींना सायकल वाटप करण्यात येणार आहे. यानंतर टप्प्या टप्प्याने गरजू होतकरू शाळकरी मुलींना आमदार नितेश राणेंकडून मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे.