भाजपा युवामोर्चा तालकाध्यक्ष सहदेव खाडये यांचा पाठपुरावा…
तळेरे (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील गडमठ येथे रस्ताचे काम सुरू असल्याने तळेरे गडमठ मार्गे फोंडाघाट एस.टी.बसची जाणारी व येणारी फेरी बंद होती. यामुळे कासार्डे माध्यमिक विद्यालयात जाणारी शाळकरी मुले व या मार्गावर जाणारे नागरीकांची गैरसोय होत होती. यासाठी कासार्डे ग्रामस्थांकडून एस.टी.विभागास पत्र दिले होते मात्र एस.टी.विभागाने दुर्लक्ष होत असल्याने भाजपा युवामोर्चा तालकाध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये,कासार्डे तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर यानी आज बुधवारी वाहतूक नियंत्रक कणकवली याची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी योग्यता चाचणी घेऊन एस.टी.सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर. बुधवारी संध्याकाळी योग्यता चाचणीसाठी एस.टी.ची गाडी दाखल होत यशस्वी चाचणी केली असून गुरूवार पासून पूर्ववत फेरी होणार आहे. यावेळेस एस.टी.अधिकारा-यांसह भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये,तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर,ग्रामपंचायत सदस्य अभिजीत धुमाळ,माजी तंटामुक्त अध्यक्ष संतोष सावंत,मूर्तीकार किशोर कुडतरकर उपस्थित होते.










