कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे कुंभारवाडी येथील एम.एस.सी.बी.ची विद्युत वाहिनी तार गेल्या अनेक दिवसांपासून पुजारे यांच्या घराला व कंपाउंडला धोकादायकरीत्या चिकटून होती. या स्थितीमुळे कोणत्याही क्षणी माणसांना किंवा जनावरांना अपघात होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली होती.
ही बाब संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्या ठिकाणी सिमेंटचा नवीन विद्युत पोल उभारून विद्युत वाहिनीची उंची वाढविण्यात आली. परिणामी, मोठा अनर्थ टळला आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
या समस्येची त्वरित दखल घेऊन काम पूर्णत्वास नेल्याबद्दल सांगवे कुंभारवाडी येथील ग्रामस्थांकडून सन्माननीय संदेश उर्फ गोटया सावंत साहेब, संबंधित पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व समाधान व्यक्त करण्यात येत आहे.










