माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांनी केले पक्षात स्वागत
कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते गावचे उबाठा चे माजी सरपंच केशव सुतार आणि सुतारवाडी ग्रामस्थांनी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या उपस्थितीत भाजप नाटळ सांगवे विभागीय कार्यालय कनेडी येथे भाजप मध्ये प्रवेश केला आम्ही अनेक वर्ष उबाठा पक्षाचे काम केले परंतु आमची विकास कामे झाली नाहीत दारिस्ते गावचा विकास हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून संदेश उर्फ गोटया सावंत करू शकतात म्हणून आंम्ही भाजप प्रवेश करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले प्रशांत सुतार, दशरथ सुतार, दीपक मेस्त्री, वैभव सुतार, आणि सुतार वाडी ग्रामस्तानी भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश ढवळ, सांगवे सरपंच संजय सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, दारिस्ते माजी सरपंच सुरेश गावकर, उपसरपंच संजय सावंत, विठ्ठल रासम, नंदू सावंत आदी उपस्थित होते.












