तळवडेत ३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचे मनीष दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : तळवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. तळवडे गावातील ३१ लाख रुपये निधीतून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन दळवी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. तळवडे गावातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना प्रवासासाठी अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन तातडीने निधी मंजूर करण्यात आला. यात भवानी मंदिर ते मांजरेकर वाडी रस्त्यासाठी १४ लाख, भाऊचा धक्का ते लोकेवाडी रस्त्यासाठी ७ लाख आणि भाऊचा धक्का ते बादेवाडी रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा समावेश आहे. मनीष दळवी यांनी श्रीफळ वाढवून या कामांची अधिकृत सुरुवात केली. या रस्त्यांमुळे गावांतर्गत दळणवळण सोपे होणार असून वाड्यावस्त्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या जाणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्याला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, संतोष परब, शंकर सावंत आणि दादा परब यांसारखे अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!