कणकवलीत ४ जानेवारीला एकदिवसीय काव्यलेखन कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचे आयोजन

कवी सतीश सोळांकूरकर व कवयित्री प्रा. सीमा हडकर यांचे मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक भवतालाचे आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे मर्मस्पर्शी लेखन कवी आपल्या कवितेतून करत असतो. कवीच्या अभिव्यक्तीला चालना मिळावी आणि मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी गोपुरी आश्रम वागदे येथे एकदिवसीय काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेस महाराष्ट्रातील नामवंत कवी, संवादक सतीश सोळांकूरकर आणि कवयित्री प्रा.सीमा हडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य कवी विठ्ठल कदम, भरत गावडे, इतिहास संशोधक प्रा.डाॅ.सोमनाथ कदम, प्रा.पूनम हेदुळकर, राहूल उर्फ राजा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा संपन्न होणार आहे.

तरी जिल्ह्यातील कवी, अभ्यासक आणि काव्यरसिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस सुनिल तांबे आणि साहित्य विभाग प्रमुख प्रा.सिद्धार्थ तांबे यांनी केले आहे.

error: Content is protected !!