नवोदित साहित्यिक प्रकाश सकपाळ यांच्या ‘कुडपाण’ कथासंग्रहाचे ११ जानेवारी रोजी प्रकाशन

खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ रत्नागिरी यांच्या पुढाकाराने स्पर्श प्रकाशन राजापूर निर्मित मुळगाव कोंडये, राजापूर येथील नवोदित लेखक प्रकाश सकपाळ यांच्या पहिल्या वहिल्या ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या ‘कुडपाण’ या कथासंग्रहाचे प्रकाशन रविवार दि. ११ जानेवारी, २०२६ रोजी निर्मला भिडे जनता विद्यालय तथा इंद्रनील तावडे ज्युनियर कॉलेज कोंडये येथील कै.रवींद्र पवार सभागृहात स.१०.३० वाजता साहित्य क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

अध्यापक विद्यालय राजापूरचे माजी प्राचार्य डॉ.मारुती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कोंडये हायकुल येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा भाषा मंडळचे प्रभारी संचालक डॉ.सुभाष वाघमारे, प्रसिद्ध ‘फक्कड’ कादंबरीकार सचिन आवटे (विटा, खानपूर),’हेलपाटा’ कादंबरीकार तानाजीराव धरणे, प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार, बालसाहित्यिक मदन हजेरी, डॉ.मिलिंद कुलकर्णी (तळेरे), स्तंभ लेखक व समीक्षक मिलिंद चिंचवलकर, मराठी भाषा तज्ज्ञ डॉ. संदीप कांबळे (रत्नागिरी), आबासाहेब मराठे कॉलेज राजापूरचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय मेस्त्री, डॉ.राजेंद्र बावळे, कोंडये सरपंच मीनल तळवडेकर, उपसरपंच महेश कारेकर आदी प्रमुख अतिथी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच कोंडये हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण कुराडे, जुवाठी विद्यालयाचे बी. के. गोंडाळ, के. डी. गवळी, बौद्ध सेवा मंडळ कोंडये मुंबई शाखेचे अध्यक्ष अनिल कोंडकर, ग्रामीण अध्यक्ष श्रीकृष्ण बाविलकर, भगीरथ सेवा मंडळ कोंडये मुंबईचे अध्यक्ष नरेश सकपाळ, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सुधीर सकपाळ, प्रकाश जाधव (शिवणकर), कोंडये पोलिस पाटील मानसी कोंडकर, राजू शिवगण आदी मान्यवर यावेळी प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील नवोदित लेखक प्रकाश सकपाळ हे खारेपाटण येथील शेठ मफतलाल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सन १९९१ – ९२ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असून एक उत्तम क्रिकेट खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख होती. लेखनाची आवड ही त्यांनी खारेपाटण कॉलेज येथे शिकत असताच जोपासली आहे. लेखक प्रकाश सकपाळ यांच्या नवीन कथासंग्रह पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचलन मुंबई येथील प्रसिद्ध निवेदिका रिया पवार या करणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ रत्नागिरीचे सचिव सुनील जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

error: Content is protected !!