वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघातर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या त्याग व कर्तृत्वामुळेच आज सर्व क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडून दिली. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरेटून स्त्रियांची मुक्तता केली असे प्रतिपादन माता रमाई महिला मंडळ वैभववाडी अध्यक्षा शारदा कांबळे यांनी केले.

वैभववाडी तालूका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे क्रांतज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव मोठया उत्साहत साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती कांबळे बोलत होत्या.
संघांचे अध्यक्ष भास्कर जाधव, सचिव रवींद्र पवार, उपाध्यक्ष संतोष कदम, संघांचे माजी सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, महिला अध्यक्षा शारदा कांबळे, सचिव रुचिता कदम, कार्याध्यक्ष मोहिनी कांबळे, श्रीमती पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाळकृष्ण जाधव, भास्कर जाधव, संतोष कदम, ममता जाधव, मोहिनी जाधव, रुचिता कदम, मोहिनी कांबळे, श्रीमती तानवडे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त करत गीतांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष रमेश बावडेकर, महादेव बावडेकर, संजय जंगम, धर्मरक्षित जाधव, अजित कदम, रुपेश कांबळे, मंगेश कांबळे, मारुती जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहसचिव शरद कांबळे यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

error: Content is protected !!