शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते गांगोवाडी ओव्हर आर्म लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : हर्षद सावंत मित्र मंडळ आयोजित भव्य ओव्हर आर्म लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या शुभहस्ते फोंडाघाट, गांगोवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील मान्यवर, क्रीडाप्रेमी युवक तसेच वाडीतील वडिलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. उद्घाटनप्रसंगी संजय आग्रे यांनी खेळाडूंना खेळातील शिस्त, संघभावना व सातत्याचे महत्त्व याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा कालावधी दि. 2, 3 व 4 जानेवारी 2026 असा असून, उद्घाटनाच्या दिवशी अनेक चुरशीचे सामने खेळविण्यात आले. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश पटेल, युवराज आग्रे, भामा सावंत, हर्षद सावंत, विजय लाड, मारुती मेस्त्री, तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ व शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्षद सावंत मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, युवकांना व्यासपीठ देणाऱ्या अशा क्रीडा स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी दिशा देणाऱ्या ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!