नगराध्यक्ष संदेश पारकरांकडून शहरातील विकासकामांची पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : शहराचा कायापालट करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर आले आहे. शनिवारी सकाळी शहरातील विविध रिंगरोड आणि गटार कामांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामात दिरंगाई न करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच सुरू असलेली विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

गांगोमंदिर ते रवळनाथ मंदिरपर्यंतच्या रिंगरोड अंतर्गत सुरू असलेल्या गटार, रस्ता व अन्य अपूर्ण कामांची नगराध्यक्ष पारकर यांनी शनिवारी सकाळी पाहणी केली. यावेळी नगरपंचायत अभियंता सचिन नेरकर, ठेकेदार जावेद शेख, तेजस राणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!