खारेपाटण पंचशील नगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण व पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रबाई फुले यांची १९५वी जयंती महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रबाई फुले यांच्या प्रतिमेला महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर व सचिव आस्था भूपेश पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे सचिव सागर पोमेडकर, बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर, संघमित्रा महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सायली तुरळकर, सचिव स्निग्धा पोमेडकर, माजी अध्यक्ष आकांक्षा पाटणकर, अंगणवाडी सेविका सविता पाटणकर-पवार यांसह सारंगी पाटणकर, नम्रता जुमलेकर, वंदना पाटणकर, सुवर्णा सांगेलकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

खारेपाटण बुद्धविहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिज्योती सावित्रबाई फुले यांची सामुदायिकरीत्या ओवी गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संतोष पाटणकर, आस्था पाटणकर, सागर पोमेडकर, बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर व कार्यक्रमाच्या अध्यक्ष संकिता पाटणकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. तर लहान मुलांनी देखील यावेळी सुंदर भाषणे सादर केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आस्था पाटणकर यांनी केले.

error: Content is protected !!