कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयामध्ये सुरु असलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, योगेशकुमार साो, यांनी अवैद्य अंमली पदार्थांचा साठा, विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिले. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत सव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची दोन पथके तयार केली व त्यांना अंमली पदार्थाची विक्री करणारे इसमांची माहिती काढुन सदर व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिल्या. सदर पथकापैकी सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक अंमली पदार्थ विक्री करणारे इसमाचा शोध घेत असताना त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, चिपरी फाटयाजळ एक इसम त्याचेकडील मोटर सायकल वरुन गांजा या अमंली पदार्थाची विक्री करीता येणार असलेची माहिती मिळाली. त्या माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी छापा कारवाई कामी सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील सहा. पोलीस निरीक्ष सागर वाघ व अमंलदार यांनी चिपरी फाटा जयसिंगपुर येथे पथकाने सापळा रचला, मिळाले बातमी प्रमाणे एक इसम स्प्लेंडर मोटर सायकलवरून आलेला दिसुन आलेने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफितीने पकडुन ताब्यात घेतले, त्यानंतर त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव राजाराम आवळे वय. 26 धंदा मजुरी रा. हडको कॉलणी 100 फुटी मिरज जि सांगली असे सांगीतले दोन पंचासमक्ष त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 05 किलो ग्रॅम गांजा, एक मोबाईल हँडसेट व गांजा विक्री करीता वापरलेली दुचाकी स्प्लेंडर मोटर सायकल असा एकुण 1,82,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. मिळून आलेला गांजा हा अमंली पदार्थ योग्य ती कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करुन दोन पंचाचे समक्ष जप्त करणेत आला आहे. गांजा हा अमंली पदार्थ विक्री करणारा इसम नामे वैभव आवळे यांचे विरुध्द जयसिंगपुर पोलीस ठाणेस एन.डी.पी.एस. कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करीत आहेत. सदर आरोपी हा सांगली जिल्हयातील रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म अॅक्ट, प्रमाणे असे एकुण 8 गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेशकुमार साो, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार साो, अपर पोलीस अधीक्षक साो, आण्णासाहेब जाधव साो, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अमंलदार वैभव पाटील, शिवानंद मठपती, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, राजु कोरे, परशुराम गुजरे, समीर कांबळे, गजानन गुरव, अनिल जाधव, यांनी केली आहे.
सांगली जिल्हयातून गांजा विक्री करीता आलेल्या इसमास अटक












