चौके मांडखोल शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा चौके मांडखोल शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील व अंगणवाडीतील मुलांनी सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विविध वेशभूषा केल्या होत्या.सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुलांनी त्यांच्या कार्यावर आधारित मौलिख विचार व्यक्त केले. तसेंच शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुषण ढवण यांनी पूर्वीच्यावेळी फुले दाम्पत्य यांनी केलेले महान कार्य व आजच्या काळात कसे आचरणात आणावे याविषयी विचार व्यक्त केले. तसेंच शाळेचें मुख्याध्यापक दिपक गोसावी यांनी आजच्या युगात आपण शिक्षणाबरोबर संस्कार किती महत्वाचे आहेत याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!