विधानपरिषद सभापती राम शिंदेचे राजन तेलींकडून कणकवलीत स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचे माजी आमदार राजन तेली यांनी कणकवली रेल्वे स्थानकावर स्वागत केले. विधानपरिषद सभापती आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून कोकण रेल्वेने त्यांचे कणकवली रेल्वे स्थानकात आगमन झाले. त्यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, कणकवली तालुकाप्रमुख दामू सावंत, माजी नगरसेवक उमेश वाळके, सत्यवान परब, सुनील पारकर, श्रीमती टेम्बकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!