विधानपरिषद सभापती राम शिंदेंचे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र विधानपरिषद चे सभापती राम शिंदे यांचे कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व अन्य पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत केले. विधानपरिषद सभापती राम शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. कणकवली येथील शासकीय विश्राम गृहावर शिंदे यांची सदिच्छा भेट घेत मिलिंद मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत, समीर प्रभूगावकर, अभय गावकर उपस्थित होते.

error: Content is protected !!