आचरा (प्रतिनिधी) : ‘पोलीस रेजिंंग डे’ निमित्त आचरा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर थ्रीपासींग शुटींग बाॅल मध्ये त्रिंबक रामेश्वर संघाने प्रथम क्रमांक मिळविला. आचरा पिरावाडी येथे झालेल्या या स्पर्धेत सहा संघानी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जनता विद्यामंदिर त्रिंबकचे चेअरमन सुरेंद्र सकपाळ, पोलीस स्टेशनचे मिलिंद परब, उद्घाटन आचरा उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, पत्रकार परेश सावंत, हेमंत पेडणेकर, मनोज पुजारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या ट्रॉफी सचिन माणगांवकर दहिबाव यांच्या मार्फत देण्यात आल्या.
‘पोलीस रेजिंंग डे’ निमित्त आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर थ्रीपासींग मध्ये त्रिंबक रामेश्वर संघ प्रथम












