वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील ६३ घरेलू कामगारांना सन्माननिधी म्हणून शासनाकडून प्रत्येकी १० हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व महिला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करीत आहेत. अशी माहिती भाजपा वैभववाडी तालूका महिला अध्यक्षा प्राची तावडे यांनी दिली. भाजपा तालूका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, नगरसेविका सानिका रावराणे, उन्नती पावले, आदी उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना तावडे पुढे म्हणाल्या, पालकमंत्री नितेश राणे यांनी तालुक्यातील जास्तीजास्त घरेलू महिला कामगारांना या योजनेत बसविण्यासाठी आमच्यावर जबाबदारी दिली होती. कोणतीही महिला शासनाच्या योजनेपासून वंचित राहाता कामा नये. अशी सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील भागातील महिलांचे या योजनेतून फॉर्म भरले होते. तालुक्यातुन ७०० महिलांनी या योजनेतून फॉर्म भरले होते. यापैकी पहिल्या टप्यात निकषात बसणाऱ्या ६३ महिलांच्या खात्यात थेट १० हजार रुपये जमा झाले आहेत. तसेच महिलांना गृहउपयोगी भांड्याचा संच सुद्धा देण्यात येणार आहे. चौकट.. लाडक्या बहिण योजनेतही वैभववाडी तालुक्यातील जास्तजास्त पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळावा. यासाठी पालकमंत्री राणे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या. त्यामुळे या योजनेत सुद्धा तालुक्यातील जास्तजास्त लाभ महिलांना झाला आहे. या दोन्ही योजनेतून माहीलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ सुरु झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणे यांचे तालुक्यातील महिला आभार व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले..
वैभववाडी तालुक्यातील ६३ महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये सन्माननिधी ; प्राची तावडे












