वागदे सरपंच संदीप सावंत यांचा यशस्वी पाठपुरावा
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून महावितरण कडून वागदे ओसरगाव साठी स्वतंत्र फिडर मंजूर झाला आहे. यासाठी वागदे सरपंच संदीप सावंत यांनी विशेष पाठपुरावा केला होता.पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रहार भवन मध्ये महावितरण अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत सरपंच संदीप सावंत यांनी वागदे ओसरगाव साठी स्वतंत्र फिडर ची मागणी केली होती. गेली कित्येक वर्षे महावितरण चा वागदे गावातून फिडर होता. सदर फिडरमधून कणकवली तालुक्यातील वागदे सातरल ,कासरल, वरवडे,बिडवाडी, पिसेकामते मालवण तालुक्यातील रामगड, गोठणे, तसेच देवगड तालुक्यातील निरोम आरे या सर्व गावांना विद्युतपुरवठा होत होता. त्यामुळे या फिडरवर अतिरिक्त लोड होत होता. कुठच्याही गावामध्ये वीजपुरवठ्याची काहीही अडचण असल्यास वरील अन्य सर्व गावामधील लाईट बंद करून काम करावे लागत होते वेगळा फिडर झाल्याने लोड कमी झाला आणि कुठच्याही एका गावामुळे इतर गावामधील लाईट बंद ठेवून दुरुस्ती कामे करावी लागत असत. त्यामुळे अन्य गावातील वीजपुरवठा खंडीत होत असे. आता स्वतंत्र फिडर मंजूर झाल्यामुळे विजग्राहकांची होणारी अडचण दूर होऊन विद्युतपुरवठा सुरळीत होणार आहे. स्वतंत्र फिडर मंजूर करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केल्याबद्दल वागदे सरपंच सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह विद्युत मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.












