खारेपाटण (प्रतिनिधी) : सत्यशोधक समता प्रतिष्ठान व सत्यशोधक शिक्षक सभा आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘सत्यशोधक वक्तृत्व स्पर्धा – २०२६’ चे आयोजन दि. १८ जानेवारी रोजी म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालय, टेंबवाडी कणकवली येथे करण्यात आले असल्याची माहिती सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी अंकुश कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या वक्तृत्व सर्धेकरीता ‘सामाजिक न्याय आणि भारतीय संविधान’ हा विषय ठेवण्यात आला असून प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला ७०००/- रुपये, चषक, प्रमाणपत्र, ग्रंथ व द्वितीय क्रमांक – ५०००/- रुपये तर तृतीय क्रमांक – ३०००/- रुपये उत्तेजनार्थ १५०० /- रुपयाची दोन स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत तर या सर्व विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच ही वक्तृत्व स्पर्धा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित ठेवण्यात आली असून स्पर्धेची प्रवेश फी २५० /- रुपये ठेवण्यात आली आहे.
या सर्धेकरीता नियम व अटी पुढील प्रमाणे – १) पहिल्या ३० स्पर्धकांना प्रवेश, २) स्पर्धेचा वयोगट १६ ते ३० वर्षे राहील. आधारकार्ड बंधनकारक, ३) स्पर्धेचा कालावधी ७ मिनिटे असेल, ४) तज्ञ परीक्षांकडून स्पर्धेचे मूल्यमापन केले जाईल, ५) परीक्षक पॅनलकडून स्पर्धकांची विषयाची समज तपासली जाईल, ६)
अल्पोपहार दिला जाईल मात्र प्रवासखर्च देय नाही. तर या वक्तृत्व स्पर्धेत ज्या स्पर्धकांना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे दि. १२ जानेवारी, २०२६ पर्यंत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते संतोष पेडणेकर – ८२०८४८४९७७ व राहुल कदम – ७२१९४५१८२८ यांचेकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












