सांगवेत विकासाला गती : संजना संदेश सावंत यांच्या शुभहस्ते विकास कामांचा शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे गावातील विकास कामांचे भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना संदेश सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सांगवे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, भाजप मांडलं उपाध्यक्ष विजय भोगटे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाबू वाळके, ग्रामपंचायत सदस्य राजेश सापळे, राजू गावकर, भरत गावकर, रमेश म्हापणकर, दिपक गावकर राजेंद्र वाळके, नाना जाधव, अभि गावकर, अनंत पेंडूरकर व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
विकास कामे खालील प्रमाणे –
1)सांगवे घोसाळवाडी स्मशानभूमी कडे जाणार रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे- 7 लाख
2)सांगवे गावकर वाडी येथील भरत गावकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-7 लाख
3)सांगवे पेंडूरकरवाडी येथे जाणारा रस्ता खडीकरणव डांबरीकरण करणे -7 लाख













