खारेपाटण (प्रतिनिधी) : युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित नॅशनल कराटे चॅम्पियन – २०२६ ही स्पर्धा नुकतीच सांगली जिल्ह्यातील जत येथे पार पडली.यामध्ये “काता” व “कुमिते” या दोन क्रीडा प्रकारात खारेपाटण हायस्कूलच्या ८ विद्यार्थ्यांनी घघवीत यश संपादन केले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
रविवार दि.४ जानेवारी २०२६ रोजी गवि सिद्धेश्वर हॉल,जत अथणी रोड ,जत ता.जत जि.सांगली येथे संपन्न झालेल्या.या कराटे स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील खालील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
१)कुमार हर्ष तावडे इ.८वी सिल्व्हर मेडल (फाईट) गोल्डन मेडल (काता)
२)कु.निधी शिवलकर इ.६वी सिल्व्हर मेडल (फाईट) सिल्व्हर मेडल (काता)३)कु.मनस्वी सकपाळ इ.५ वी सिल्व्हर मेडल (फाईट)४)
कुमार आर्यन कोवळे इ.६ वी ब्राँझ मेडल (फाईट) ब्राँझ मेडल (काता)
५)कु.मनस्वी राऊत इ.५ वी ब्राँझ मेडल (फाईट) ब्राँझ मेडल (काता)
६)कु.त्रिशा साळुंखे इ.५वी ब्राँझ मेडल (फाईट) ब्राँझ मेडल (काता)
७)कु.सुखदा राऊत इ.५ वी ब्राँझ मेडल (फाईट)८)कु.दृष्टी चव्हाण इ. ६वी ब्राँझ मेडल (फाईट) खारेपाटण हायस्कूलच्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कराटेपट्टू युवराज राठोड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नुकत्याच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष रघुनाथ राणे,सचिव महेश कोळसुलकर,सर्व विश्वस्त,प्रशालेचे प्राचार्य संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.












