विश्वासात न घेता देवगड–निपाणी रस्त्यावरील वर्दळीचे दोन सुस्थितीतील ब्रिज उद्ध्वस्त करण्याचा ठेकेदार एपीचा मनसुबा !

लगतच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सह पोलीस अधीक्षक, परिवहन अधिकारी, तहसीलदार यांची शिफारस !

फोंडावासीयांना किमान जिल्हाधिकाऱ्यांनी, ठेकेदाराने विश्वासात घेणे गरजेचे ! जनतेमध्ये प्रचंड जनक्षोभ !

प्रत्यक्ष पाहणी करून आणि पर्यायी व्यवस्थेबाबत चर्चेने समाधान करावे — ग्रामस्थांची आग्रही मागणी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : देवगड- निपाणी राज्यमार्ग क्रमांक १७८ वरील ब्रिटिशकालीन दोन पूलांची पुनर्बांधणी करण्यासाठी, अचानक जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी तारीख ०७- ०१- २६ च्या पत्राद्वारे तारीख १५ जानेवारीपासून, वाहने व वाहतूक वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे १५ जानेवारीपासून दोन्ही पूल पाडण्याच्या कामास सुरुवात होईल.मात्र या आदेशाची माहिती सरपंच, ग्रामपंचायत फोंडा यांना देण्यात आलेली नाही.अथवा पुला लगतच्या कबजेदारांनाही विश्वासात, ना ठेकेदारांनी घेतले ना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ! ह्या मनमानी आणि “हम करे सो कायदा” बद्दल फोंडावासीयामध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. प्रथम ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन पर्यायी मार्ग , डायव्हरशन, कामाची मुदत याबाबत शंकासमाधान करून हमी द्यावी आणि मगच बांधकाम सुरू करावे. अशी संतप्त मागणी फोंडावासियांकडून होत आहे…..

फोंडाघाट बाजारपेठ उतारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. कोकण, कोल्हापूरला जोडणारा देवगड- निपाणी रस्त्यावरील हे दोन महत्त्वाचे सुस्थितीतील ब्रिटिशकालीन पूल सध्या आंबोली, गगनबावडा, वैभववाडी घाटाच्या दुरुस्तीमुळे, या मार्गावर पर्यटक, चारचाकी अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. फोंडाघाट वासियांना अंधारात ठेवून पूल बांधणीचा निर्णय विश्वासघात करणारा आहे. त्यामुळे फोंडाघाट बाजारपेठ उतारपेठ उध्वस्त होणार आहे. या आदेशात कळविण्यात आलेला मार्ग गावाला तोडणारा,दूरवरून जाणारा आणि तहसीलदार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी कार्यालयात बसून आणि पाहणी न करता अभिप्राय दिल्याने आहे. त्यामुळे फोंडावासीयांना पूल बांधणी पूर्ण होईपर्यंत प्रचंड मनस्ताप, आर्थिक भुर्दंड आणि त्रासदायक ठरणार आहे. पर्यायी मार्ग पूर्णतः चुकीचे आहेत ….

सध्या केंद्र सरकारच्या हॅम विभागातर्फे निखिल कन्स्ट्रक्शन कडून घाटाचे रुंदीकरण, संरक्षक भिंती, गटारे ,खडीकरण, काँक्रिटीकरण, डांबरीकरण इत्यादी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत,त्याची सामानाची वाहतूक याच रस्त्यावरून होते. त्यांनाही हे पुल उध्वस्त केल्यामुळे अडचणी येणार आहेत. देवगड- निपाणी हा रस्ता ह्यांचे कडे वर्ग करण्यात आला. मात्र हे दोन पूल रस्ता हस्तांतरित करण्यापूर्वीच सिंधुदुर्ग बांधकाम विभागाने स्वतःकडेच राखून, ठेकेदाराचे उखळ पांढरे केले. शिवाय निखिल कन्स्ट्रक्शन ने रस्ता बंद करण्यासाठी दिलेल्या पत्रास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती.
अचानक पूल उध्वस्त करण्यासाठी वाहतूक वळविण्याचे आदेश का दिले ? गेले हे मात्र समजू शकत नाही….

त्यामुळे फोंडाघाट ग्रामपंचायत ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन पर्यायी व्यवस्थेची आणि काम पूर्ण कधी होणार याची माहिती घ्यावी.मगच बांधकामाला सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा विनापरवानगी उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!