सागर कवच मोहिमेत पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणा पास

पहिल्याच दिवशी समुद्रात 10 वावामध्ये रेड टीमला पकडण्यात आले यश

देवगड (प्रतिनिधी): सागर कवच मोहिमेत पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणा पास झाली पहिल्याच दिवशी समुद्रात 10 वावामध्ये रेड टीमला पकडण्यात आले यश. गुरूवारपासून सुरू झालेल्या सागर कवच अभियानात पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणा पास झाली असून घुसघोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या रेड टीमला देवगड पोलिस ,सागर सुरक्षा विभाग यंत्रणेने पकडले आहे. सागर कवच अभियान 27 व 28 एप्रिल या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येत असून गुरूवारी पहिल्याच दिवशी या अभियानाअंतर्गत देवगड समुद्रामध्ये संशयास्पद बोट दुपारी 3.40 वाजता 10 नॉटीकल मैल मध्ये येत असल्याची माहिती मिळाल्यावर देवगड पोलिस आणि सागर सुरक्षा विभाग या यंत्रणेमार्फत सागर स्पीड बोटीच्या सहाय्याने समुद्रात असलेल्या संशयास्पद बोटीचा पाठलाग करीत ती बोट ताब्यात घेण्यात आली. त्या बोटीमध्ये रेड टीमचे दोन पोलिस अंमलदार व तटरक्षक दलाचे एक अंमलदार घुसघोरी करण्याचा प्रयत्नात असताना सापडले. रेटींगमध्ये दोन डमी बाँब मिळून आले. रेटींगच्या बोटीचे पीटीडीएस् पथकामार्फतत तपासणी करण्यात आली. रेट टीमला पकडण्यासाठी गेलेल्या स्पीड बोटीवर पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळूंखे, दशरथ चव्हाण, शकील अहमद, तरवडकर आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी होते.देवगड पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणेने ही मोहिम यशस्वी केली.दोन दिवस सागर कवच अभियान असल्याने पुढील घुसघोरी रोखण्यासाठी पेट—फिलिंग व सागर गस्त नेमण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टिने महत्वाचा पॉईंटवर पोलिस यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली असून पेट—फिलिंग सुरू आहे अशी माहिती पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!